मद्यधुंदांच्या कारखाली चिरडून लखनौत 4 मजूर ठार

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

लखनौ- मजुरांसाठी असलेल्या रात्रनिवाऱ्याच्या ठिकाणी रात्री मद्यधुंद अवस्थेतील लोकांची कार घुसल्याने तेथील चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. लखनौमधील डालीबाग येथील मंत्री निवासाच्या समोर ही घटना घडली. 

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्यांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर तिघे फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत्युमुखी पडलेले मजूर उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागातील असल्याचे सांगण्यात आले. 

या रात्रनिवाऱ्यामध्ये 35 मजूर झोपलेले होते. त्यावेळी ती संबंधित कार अतिशय वेगाने येऊन त्यावर आदळली. 
 
Web Title: Lucknow: At least 4 killed, 6 injured as car crashes into night shelter