गोरखपूरमधील मृत्यू तांडव: नऊ जणांविरोधात "एफआयआर' दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

लखनौ : गोरखपूरमध्ये बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्‍सिजनअभावी 60 बालकांचा मृत्यू झाल्यामुळे टीकेचे लक्ष्य झालेल्या उत्तर प्रदेश सरकारने आज आरोपींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी नऊ जणांविरोधात "एफआयआर' दाखल करण्यात आला असून, यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यांचाही समावेश आहे.

लखनौ : गोरखपूरमध्ये बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्‍सिजनअभावी 60 बालकांचा मृत्यू झाल्यामुळे टीकेचे लक्ष्य झालेल्या उत्तर प्रदेश सरकारने आज आरोपींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी नऊ जणांविरोधात "एफआयआर' दाखल करण्यात आला असून, यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यांचाही समावेश आहे.

रुग्णालयास ऑक्‍सिजनचा पुरवठा करणाऱ्या "पुष्पा सेल्स' या कंपनीच्या प्रवर्तकांच्या नावाचाही "एफआयआर'मध्ये समावेश असून, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव अनिता भटनागर जैन यांचीही तातडीने बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील समितीने आपला अहवाल बुधवारीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर केला होता. माजी प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी डॉ. पूर्निमा मिश्रा, डॉ. काफील खान आणि "पुष्पा सेल्स'च्या प्रवर्तकांचा "एफआयआर'मध्ये समावेश आहे, असे लखनौ विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अभय प्रसाद यांनी "पीटीआय'शी बोलताना सांगितले.

विशेष ऑडिटची शिफारस
गुन्हेगारी कारस्थान, सदोष मनुष्यवध आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या विविध तरतुदींअन्वये आरोपींविरोधात "एफआयआर' दाखल करण्यात आले आहेत. राज्य सरकाने नेमलेल्या समितीने भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली डॉ. राजीव मिश्रा, डॉ. पूर्निमा शुक्‍ला, वैद्यकीय महाविद्यालयातील लेखा विभागातील कर्मचारी आणि महाविद्यालयातील औषध विभागाचे प्रमुख गजानन जैस्वाल यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस केली होती. मागील तीन वर्षांमध्ये रुग्णालयाने खरेदी केलेली विविध प्रकारची औषधे आणि रसायने यांचेही कॅगच्या माध्यमातून विशेष ऑडिट केले जावे, अशी शिफारस या समितीने केली आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नियमाविरोधात वागणे आणि प्रतिज्ञापत्रामध्ये दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी डॉ. खान यांच्याविरोधातही कठोर कारवाई केली जावी, अशी शिफारस समितीने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तपास समितीकडून हा अहवाल सादर होताच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: lucknow news gorakhpur hospital issue and police fir