'आयएसआय'च्या हस्तकाला स्टेनोग्राफरकडून गोपनीय माहिती

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

लखनौ: उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या स्टेनोग्राफरकडून लष्कराची गोपनीय माहिती अनधिकृतपणे "आयएसआय'या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेलच्या हस्तकाला पुरवत असलल्याचे उघड झाल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिली आहे. गेल्या 2009 पासून अशी गोपनीय माहिती बाहेर जात असल्याचा दावा "एटीएस'ने केला आहे.

लखनौ: उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या स्टेनोग्राफरकडून लष्कराची गोपनीय माहिती अनधिकृतपणे "आयएसआय'या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेलच्या हस्तकाला पुरवत असलल्याचे उघड झाल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिली आहे. गेल्या 2009 पासून अशी गोपनीय माहिती बाहेर जात असल्याचा दावा "एटीएस'ने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार "एटीएस'ने जिल्ह्यातील झांशी कॅंटोन्मेंटमधील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात तपास केला असता, लष्कराशी संबंधित पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी असलेला स्टेनोग्राफर राघवेंद्र अहिरवार हा गेल्या 2009 पासून लष्कराच्या गोळीबार आणि शस्त्र सरावाबाबतची संवेदनशील आणि गोपनीय माहिती "आयएसआय'च्या हस्तकाला देत असल्याचे उघडकीस आल्याचे "एटीएस'च्या प्रवक्‍त्याने सांगितले.

"एटीएस'चे पोलिस अधीक्षक असीम अरुण म्हणाले, ""राघवेंद्र याच्याकडे विचारणा केली असता, त्याला बाबिना येथून मेजर यादव नावाने फोन येत असे. ते राघवेंद्रकडून पत्रव्यवहारातील गोपनीय माहिती विचारत होते. मेजर यादव हे नऊ आकडे असलेल्या वेगळ्याच क्रमांकावरून फोन करत असे. त्याला "कॉल बॅक'ची सुविधा नव्हती. मेजर पदावरील अधिकारी या माहितीसाठी थेट आपल्याला फोन का करतात, याची खातरजमा राघवेंद्रने केली नाही. गेल्या जुलै 2017 मध्ये अतिरिक्त न्यायदंडाधिकारी कार्यालयात बदली झालेल्या राघवेंद्रने लष्कराची गोपनीय माहिती अनधिकृतपणे बाहेरच्या माणसाला दिल्याची कबुली दिली आहे.''

राघवेंद्रने इंटरनेटद्वारा आलेले फोनही घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भातील चौकशी समितीने राघवेंद्रला सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्याची शिफारस केली आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गोपनीय माहितीबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. "एटीएस' राघवेंद्रच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: lucknow news isi pakistan and stenographer