देशाला काम करणाऱ्या पंतप्रधानांची गरज : मायावती

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

अमित शहा यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

लखनौ : देशाला बोलणाऱ्या नाही तर काम करणाऱ्या पंतप्रधानांची गरज आहे, असे स्पष्ट करीत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पंतप्रधान एकतर्फी वक्तव्य करतात, तसेच सरकारी प्रसारमाध्यमांचा आणि साधनांचा स्वत:साठी वापर करतात, असा आरोपही त्यांनी पंतप्रधानांवर केला.

मायावती म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात हे कठोर वास्तव भाजप अध्यक्षांनी देशासमोर मांडले आहे. मात्र जनतेला आणि विरोधकांना काम करणारा पंतप्रधान हवा आहे. अमित शहा यांनी काल अमेठीतील सभेत राहुल गांधी यांच्यावर टीका करीत कॉंग्रेसने आपल्या शासन काळात काय केले, असा सवाल करीत आज देशाला एक बोलणारा पंतप्रधान मिळाला आहे, असे ते म्हणाले होते.

मायावती म्हणाल्या, की विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी, स्वातंत्र्य आणि उदारता दाबण्यासाठीच शक्तीचा वापर करण्यात येत आहे, असे असूनही भाजप म्हटते, की त्यांनी एक बोलणारा पंतप्रधान दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारवरही त्यांनी या वेळी टीका केली. राज्य सरकारसुद्धा केंद्राप्रमाणेच काम करीत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय खराब झाली आहे, असे मायावती म्हणाल्या.

Web Title: lucknow news Need PM who works for the country: Mayawati