esakal | PMAY-U अंतर्गत 75 हजार लाभार्थ्यांना घरे; PM मोदींनी सोपवली किल्ली
sakal

बोलून बातमी शोधा

PMAY-U अंतर्गत 75 हजार लाभार्थ्यांना घरे; PM मोदींनी सोपवली किल्ली

PMAY-U अंतर्गत 75 हजार लाभार्थ्यांना घरे; PM मोदींनी सोपवली किल्ली

sakal_logo
By
विनायक होगाडे

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मंगळवारी लखनऊमध्ये प्रधानमंत्री आवास योजना-अर्बनच्या अंतर्गत 75 जिल्ह्यातील 75,000 लाभार्थ्यांना त्यांच्या घराची किल्ली सोपवली. या व्हर्च्यूअल कार्यक्रमामध्ये या योजनेतील पात्र लाभार्थी सामील होते. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी या योजनेतील लाभार्थ्यांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. लखनऊमध्ये ते एका नागरी परिषदेसह विविध विकासकामांचे उद्घाटनही करणार आहेत.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी आज UPच्या दौऱ्यावर, मोठ्या घोषणेची शक्यता

हेही वाचा: शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला हत्याकांडासारखा : शरद पवार

गुजरातमध्येच अर्बन प्लॅनिंगवर फोकस

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलंय की, पंतप्रधान मोदी जेंव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेंव्हाच त्यांनी अर्बन प्लॅनिंगवर लक्ष केंद्रीत केलं होतं. भूकंपाने, प्लेगमुळे पीडित सूरतचा चेहरा बदलण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. लखनऊमध्ये अर्बन कॉन्क्लेव्ह आयोजित केल्याने या शहरासोबतच इतर शहरांसाठीही एक नवं चित्र उभं राहिल. तसेच पंतप्रधानांनी एका नव्या भारताचं स्वप्न पाहिल्याचंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात संबोधित करताना म्हटलंय की, मला हे चांगलं वाटतंय की, तज्ञांनी लखनौमध्ये आयोजित या कार्यशाळेत भारताच्या शहरांच्या स्वरूपावर विचारमंथन केलं आहे. ते म्हणाले की, येथील नागरिकांनी याठिकाणी लावलेलं हे प्रदर्शनही पाहावे. पुढे विकास योजनांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पीएम आवास योजनेअंतर्गत दिलेल्या घरांमध्ये महिलांना 80 टक्के मालकी हक्क दिला आहे, हा एक स्तुत्य निर्णय आहे.

मला ही बाब कौतुकास्पद वाटतेय की, तीन दिवस लखनऊमध्ये भारतातील शहरांच्या नव्या स्वरुपावर देशातील तज्ज्ञ चर्चा तसेच मंथन करत आहेत. या ठिकाणी जे प्रदर्शन भरवलं गेलंय, ते प्रदर्शन स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये देशाच्या 75 वर्षांतील कमाई तसेच देशाच्या नव्या संकल्पांना व्यवस्थितरित्या प्रदर्शित करत आहेत.

2014 नंतर, आमच्या सरकारने शहरात पीएम आवास योजनेअंतर्गत 1.13 कोटीहून अधिक घरे बांधण्याची परवानगी दिली आहे. यापैकी, आतापर्यंत 50 लाखांहून अधिक घरे बांधली गेली आहेत आणि गरिबांना देण्यात आली आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

loading image
go to top