

A viral video captures the shocking Lucknow triple murder case involving RSS leader Shiv Tiwari, his son Suyash, and brother Shivendra. Police arrested the accused Rishabh Shukla and several family members in connection with the incident
esakal
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते शिव तिवारी, त्यांचा मुलगा सुयश आणि भाऊ शिवेंद्र यांच्या हत्येचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी ऋषभ शुक्ला याने तिघांवर गोळीबार केल्याचे दिसत आहे. सुरुवातीला त्याने सुयशवर गोळी झाडली. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या शिव तिवारी यांच्या डोक्यात गोळी मारली. त्यानंतरही त्याने गोळीबार सुरूच ठेवला. पिस्तुलातील गोळ्या संपल्यानंतर मॅगझिन बदलून त्याने पुन्हा गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्याकांडाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.