स्टॅलिनच होणार द्रमुकचे 'थलैवा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

डीएमकेच्या पक्षप्रमुखपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती, पण यात स्टॅलिन यांची बिनविरोध निवड झाली. पक्षाचे खजिनदार म्हणून दुराईमुर्गन यांची निवड झाली आहे. स्टॅलिन यांचे मोठे भाऊ अलागिरी यांनी स्टॅलिन यांच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. अलागिरी यांना 2014 मध्ये पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते.  

चेन्नई : डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर डीएमके पक्षाचा उत्तराधिकारी कोण यावर बैठकीनंतर झालेल्या निर्णयात त्यांचे पुत्र एम.के. स्टॅलिन हे डीएमके हा पक्षाचा पुढील कारभार पाहतील. करूणानिधींनी सामाजिक जीवनातील सहभाग बंद केल्यानंतर स्टॅलिन यांनी पक्षाची पूर्ण जबाबदारी सांभाळली होती.    

आज (ता. 28) स्टॅलिन (वय 65) हे चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात अधिकृतपणे पदभार स्विकारणार आहेत, त्यामुळे मुख्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. स्टॅलिन हे पक्षाचे दुसरे पक्षप्रमुख असतील. यापूर्वी करूणानिधी यांनी 49 वर्षे पक्षाची धुरा सांभाळली होती.  

डीएमकेच्या पक्षप्रमुखपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती, पण यात स्टॅलिन यांची बिनविरोध निवड झाली. पक्षाचे खजिनदार म्हणून दुराईमुर्गन यांची निवड झाली आहे. स्टॅलिन यांचे मोठे भाऊ अलागिरी यांनी स्टॅलिन यांच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. अलागिरी यांना 2014 मध्ये पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते.  

स्टॅलिन यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री, 2 वेळा चेन्नईचे महापौरपद सांभाळले आहे. तसेच सत्तेत असताना त्यांनी अनेक मंत्रीपदेही भूषविली आहेत. तसेच तमिळनाडूतील विधानसभा निवडणूकीत त्यांनी करूणानिधींच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.

Web Title: M K Stalin takes change of DMK after death of M Karunanidhi