
Summary
पंतप्रधान मोदींनी जाहीर केले की या वर्षाअखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात येतील.
भारतात १० नवीन अणुभट्ट्या बांधून अणुऊर्जेची क्षमता १० पट वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
अंतराळ व संरक्षण क्षेत्रात स्वदेशी फायटर जेट इंजिन आणि अंतराळ केंद्र उभारणीची योजना आहे.
भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवतील. ते सलग १२ व्या वेळी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवला आणि देशाला संबोधित केले, ते म्हणाले की, ५० वर्षांपूर्वी सेमीकंडक्टरची फाईल दाबली गेली. पण आता मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येतील.