आत्मनिर्भर भारत: अमेरिकेप्रमाणे आपणही बनवणार रडारला न सापडणारं फायटर विमान | Fighter jet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jet

आत्मनिर्भर भारत: आपणही बनवणार रडारला न सापडणारं फायटर विमान

नवी दिल्ली: भारत लवकरच पाचव्या पिढीची फायटर विमान (Fifth generation) विकसित करण्याच्या आपल्या महत्वकांक्षी प्रकल्पावर काम सुरु करणार आहे. AMCA वर्गात मोडणारी ही फायटर विमान (Fighter jet) स्टेल्थ फिचरने (Stealth feature) सुसज्ज असणार आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानाचं वैशिष्टय म्हणजे ही विमान रडारवर सहसा दिसत नाहीत. रडारला चकवून शत्रुच्या प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची या पाचव्या पिढीच्या विमानांची क्षमता असते.

दोन इंजिन असलेल्या AMCA फायटर विमानांचे नमुने निश्चित झाले आहेत. पुढच्यावर्षीच्या सुरुवातीला सुरक्षेविषयीच्या कॅबिनेट समितीकडे मंजुरीसाठी हे नमुने पाठवले जाणार आहेत, उच्च सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. पाचव्या पिढीच्या फायटर विमानांची टेक्नोलॉजी विकसित करणं खूपच कठिण आणि महागडी प्रक्रिया आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेकडे F-22 रॅप्टर, F-35, चीनचे चेंगडू J-20 आणि रशियाचे सुखोई-57 ही पाचव्यापिढीची फायटर विमानं कार्यरत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: भाजपाचे चार नगरसेवक फोडले, कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेकडून धक्का

J-20 आणि सुखोई-57 हे पूर्णपणे पाचव्या पिढीच्या तंत्रज्ञानाने अद्यावत नाहीय, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारताकडे सध्याच्या घडीला राफेल हे ४.५ जनरेशनचे सर्वात अत्याधुनिक फायटर विमान आहे. भारताने फ्रान्सकडून ही विमाने विकत घेतली आहेत.

हेही वाचा: 'मोदींनी शेतकऱ्यांबद्दल गोड भाषा केली, आम्हाला संशय येतोय'

AMCA प्रोजेक्टची किंमत १५ हजार कोटी रुपये आहे. प्रोटोटाइपचा पहिला नमुना २०२५-२६ साली समोर येईल. DRDO आणि ADA या दोन संस्थांची स्टेल्थ फायटर विमान निर्मिती प्रकल्पात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे.

loading image
go to top