'मोदींनी शेतकऱ्यांबद्दल गोड भाषा केली, आम्हाला संशय येतोय' | Farmers protest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

'मोदींनी शेतकऱ्यांबद्दल गोड भाषा केली, आम्हाला संशय येतोय'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- संतोष शालीग्राम

नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी शेतकऱ्यांविषयी गोड भाषा केली. आम्हाला संशय येतोय. तुम्हाला पंतप्रधान राहयचे, तर राहा. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. २० कायदे येणार आहेत, त्यावर चर्चा करा. MSP कायदे रद्द करा. मग आंदोलन थांबेल. या आंदोलनाचा सोक्षमोक्ष दिल्लीतच लागेल. देशातील जनता तुमच्यावर नाराज आहे. चर्चा करा" असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh tikait) यांनी दिला आहे.

"कोणत्याही झेंड्याला आंदोलनाला विरोध नव्हता. त्यामुळे आंदोलनाला बळकटी आली. एकजूटता दिसली. मोदींनी शेतकऱ्यांमधे फूट पाडली, अशी टीका टिकैत यांनी केली. काही लोकांना कायदे समजले नाही, हे शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी विधान आहे. शेतकऱ्यांना msp दिली, तरच कल्याण होईल" असे टिकैत म्हणाले.

हेही वाचा: संसदेच्या अधिवेशनाआधी होणार सर्वपक्षीय बैठक; PM मोदी राहणार उपस्थित

"MSP साठी कमिटी केली असे सांगतात. पण ते खोटे बोलत आहेत. आधीच कमिटी होती. आता कमिटी नको. निर्णय घ्या. आता आमच्याकडे वेळ नाही. स्वामीनाथन कमिटीच्या शिफारस लागू करण्याची हमी दिली. पण अजूनही शिफारसी लागू नाहीत. १९६८ मधे तीन क्विंटल गहू विकले की, एक तोळा सोने यायचे. आजही आम्हाला तीन क्विंटलमधे एक तोळा सोना हवे. बाजार समित्या या खासगी बाजार होणार आहेत. तरुणांनी आता आंदोलनाला तयार राहावे" असे टिकैत म्हणाले.

हेही वाचा: 'त्या प्रकरणात मी फक्त प्यादा,' वाझेचा चौकशी समितीसमोर खुलासा

"गावातल्या जमिनी कंपन्यांना दिल्या जाणार आहेत. बाजार समित्यांच्या जमिनी विकल्या जाणार. तुम्हाला हिंदू, मुस्लिमांमध्ये विभागून हे लोक देश विकून टाकतील. MSPची हमी, दुधाचे धोरण, शहीद शेतकऱ्यांना मदत असे अनेक प्रश्न आहेत. ते कधी सोडवणार? फक्त तीन कायदे आपले प्रश्न नाही. आणखी येणाऱ्या कायद्यावरही आमच्याशी चर्चा केली पाहिजे. आता देशभरात आंदोलन चालेल" असे टिकैत म्हणाले.

loading image
go to top