esakal | गुजरातचे 4 वेळा CM राहिलेल्या माधवसिंह सोलंकी यांचं निधन; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

Madhav singh solankh

त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

गुजरातचे 4 वेळा CM राहिलेल्या माधवसिंह सोलंकी यांचं निधन; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दिल्ली : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचं आज निधन झालं आहे. सोलंकी यांनी गुजरात राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला आहे. त्यांचं वय 94 वर्षे होते. सोलंकी हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते होते. तसेच त्यांनी एकवेळेला भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे. 

त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, श्री माधवसिंह सोलंकी हे एक बलाढ्य नेते होते. त्यांनी अनेक दशकांपासून गुजरातच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. समाजासाठी केलेल्या या  सेवेबद्दल त्यांचे नेहमी स्मरण केले जाईल. त्यांच्या निधनाने शोक झाला असून मी त्यांचा मुलगा भारत सोलंकीजी यांच्याशी बोललो आणि दु:ख व्यक्त केले. ओम शांती.

हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत 228 रुग्णांचा मृत्यू; राज्यातील मृतांची संख्या 49,970 वर
पुढे त्यांनी म्हटलं की, राजकारणापलीकडे माधवसिंह सोलंकीजी वाचनाचा आनंद घेत असत आणि सांस्कृतिक बाबींबद्दल ते उत्साही असत. मी जेव्हा जेव्हा त्याला भेटायचो किंवा त्याच्याशी बोलायचो तेव्हा आम्ही पुस्तकांवर चर्चा करायचो आणि तो मला नुकत्याच वाचलेल्या नव्या पुस्तकाबद्दल सांगायचे. आमच्यात झालेल्या संवादांची मी नेहमीच कदर करतो, असंही मोदींनी म्हटलं आहे.