BJP Leader Crime
esakal
BJP Leader Crime : मध्य प्रदेशात शेतजमिनीच्या वादातून घडलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुनामधील गणेशपुरा गावात भाजप पदाधिकारी महेंद्र नागर याने आपल्या टोळक्यासह एका शेतकऱ्याची निर्दयपणे (Land Dispute Violence) हत्या केली आहे. आरोपीने शेतकऱ्याला आधी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर थार कारखाली चिरडून ठार मारले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.