esakal | भाजप खासदाराचे दिल्लीत निधन; कोरोना झाल्यानंतर खालावली होती प्रकृती

बोलून बातमी शोधा

madhya pradesh mp nandkumar singh chauhan}

मध्य प्रदेशातील भाजप खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचे निधन झाले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भाजप खासदाराचे दिल्लीत निधन; कोरोना झाल्यानंतर खालावली होती प्रकृती
sakal_logo
By
टीम ई सकाळ

भोपाळ - मध्य प्रदेशातील भाजप खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचे निधन झाले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, नंदकुमार सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली होती. 

नंदकुमार सिंह चौहान यांचा मुलगा हर्षवर्धन चौहान यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. खंडवा मतदारसंघातील खासदार आणि माजी भाजप प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान जवळपास 1 महिन्यापासून दिल्लीतील रुग्णालयात होते. 11 जानेवारीला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर भोपाळमधील रुग्णालयात उपाचर सुरु होते.

हे वाचा - भारतीय लसींच्या IT सिस्टीमला हॅक करण्याचा चीनचा प्रयत्न; फॉर्म्यूला चोरण्याचा डाव

प्रकृती जास्तच खालावल्याने नंदकुमार सिंह चौहान यांना दिल्लीत मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.  चौहान यांचे पार्थिव दुपारी एअर अॅम्ब्युलन्सने खंडवा इथं आणलं जाईल. त्यानंतर बुरहानपूर इथल्या त्यांच्या शाहपूर गावामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.