esakal | भारतीय लसींच्या IT सिस्टीमला हॅक करण्याचा चीनचा प्रयत्न; फॉर्म्यूला चोरण्याचा डाव

बोलून बातमी शोधा

corona china hackers}

कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत.

भारतीय लसींच्या IT सिस्टीमला हॅक करण्याचा चीनचा प्रयत्न; फॉर्म्यूला चोरण्याचा डाव
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. भारतात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेदरम्यानच भारतीय लस उत्पादकांच्या आयटी सिस्टीमला हॅकर्सनी टार्गेट केलं आहे. भारतीय लस उत्पादकांच्या आयटी सिस्टीमला हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हॅकींगचा हा प्रयत्न चीनधील हॅकर्सच्या एका ग्रुपने केला आहे. अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सायबर इंटेलिजेन्स फर्म Cyfirma च्या हवाल्याने दिली आहे.

त्यांनी सांगितलंय की ज्या दोन लस उत्पादकांच्या आयटी सिस्टीमला हॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यांच्या लसीचा उपयोग देशात सध्या लसीकरणासाठी करण्यात येतोय. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीची सप्लाय चेन खंडीत करण्याचा या हॅकर्सचा उद्देश आहे. सिंगापूर आणि टोकीयोमध्ये असणारी सायबर गुप्तचर कंपनी सायफार्माने म्हटलंय की, चीनी हॅकर्स APT10, ज्यांना स्टोन पांडा नावाने देखील ओळखलं जातं, त्यांनी भारत बायोटेक आणि सीरमच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सप्लाय चेन सॉफ्टवेअरमधील कच्चे दुवे आणि त्रुटी शोधण्याचे प्रयत्न केले आहेत, जेणेकरुन ते हॅक केले जाऊ शकतील. 

हेही वाचा - सर्वसामान्यांना पुन्हा दणका; CNG आणि PNG च्या दरांमध्ये वाढ; जाणून घ्या काय आहेत भाव

भारत जगभरात विकल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या लसींचे 60 टक्क्यांहून अधिक उत्पादन करतो. या पार्श्वभूमीवर चीन भारतातील लसीची सप्लाय चेन खंडीत करु इच्छितो. यामागील खरा उद्देश हा बौद्धिक संपदा चोरून घेणे आणि भारतीय औषध उत्पादक कंपन्यांशी स्पर्धात्मक फायदा मिळवणे हा आहे, असं  ‘एमआय6’ या ब्रिटिश विदेशी गुप्तचर संघटनेत सायबर अधिकारी असलेल्या सायबर फर्मचे सीईओ कुमार रितेश यांनी सांगितलं. APT10 अनेक देशांसाठी अ‍ॅस्ट्राझेनेका लशीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला लक्ष्य करत होता, अशीही माहिती त्यांनी दिली.