esakal | भ्रष्टाचाराचा अजब कारभार! उद्घाटनाआधीच पूल गेला वाहून; पाहा VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

mp

कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पुल काम पूर्ण होण्यासाठी दिलेल्या तारखेआधीच वाहून गेला आहे. उद्घाटनाआधीच नदीला आलेल्या पुरात पूल कोसळला. 

भ्रष्टाचाराचा अजब कारभार! उद्घाटनाआधीच पूल गेला वाहून; पाहा VIDEO

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिवनी - मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा अजब कारभार समोर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पुल काम पूर्ण होण्यासाठी दिलेल्या तारखेआधीच वाहून गेला आहे. उद्घाटनाआधीच नदीला आलेल्या पुरात पूल कोसळला. मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान, नदीवर कोट्यवधी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला आहे. एक महिन्यापूर्वीच पुलावरून वाहतुक सुरु झाली आहे. याचे उद्घाटनसुद्धा अद्याप झाले नव्हते त्याआधीच वाहून गेला आहे. तुटलेल्या पुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये नदीच्या वाढलेल्या पाण्यात एक पूल वाहून गेल्याचं दिसत आहे. 

पुलाच्या बाजुला लावण्यात आलेल्या बोर्डवर याच्या खर्चाची आणि इतर माहिती दिली आहे. पूल बांधण्यासाठी 3 कोटी 7 लाख रुपयांचा खर्च झाला. पुलाच्या बांधकामाला 1 सप्टेंबर 2018 मध्ये सुरुवात झाली होती. 30 ऑगस्ट 2020 ला बांधकाम पूर्ण होण्याची तारीख निश्चित कऱण्यात आली होती. त्याआधीच महिनाभर पूल बांधून तयार होता. दरम्यान, लोकांनी त्याचा वापरही सुरु केला. याचे उद्घाटन होण्याआधी 29 ऑगस्टच्या मध्यरात्रीच पुल वाहून गेला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जो कोणी दोषी असेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. 

सिवनी जिल्ह्यातील केवलारी विधानसभा मतदारसंघात हा पूल आहे. या मतदारसंघात भाजपचे आमदार राकेश पाल असून आता प्रशासनाकडून पुलाचे बांधकाम करणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. पुल तुटल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

हे वाचा - चक्क आरोग्य मंत्र्यांनी स्वच्छ केलं कोविड रुग्णालयातील शौचालय! (Video)

वैनगंगा नदीवरील हा पूल सुनवारा आणि भीमगढ या गावांना जोडत होता. मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे. राज्यातील 390 हून अधिक गावांना पुराचा तडाखा बसल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी दिली.