चक्क आरोग्य मंत्र्यांनी स्वच्छ केलं कोविड रुग्णालयातील शौचालय! (Video)

 puducherry health minister, covid ward
puducherry health minister, covid ward

एखाद्या राज्याचा मंत्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती लाल दिव्याची गाडी, इस्त्री केलेले कपडे तसेच दिसतो तो त्यांच्यातील एक वेगळ्याच प्रकारचा तोरा! आज आपल्याला देशात ही राजकारणी लोकं नुसती आश्वासनं देऊन फुशारक्या मारताना दिसतात. पण असेही काही आमदार, खासदार आणि मंत्री असतात जे उक्ती प्रमाणे कृती करतात. ते आपल्या कृतीतूनच एक आदर्श निर्माण करत असतात. असाच एक किस्सा काल पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश (Puducherry) असणाऱ्या राज्यात घडला, जो बाकीच्या राज्यातील राजकारणी मंडळींसाठी ही कृती आदर्श निर्माण करणारी आहे. 

शनिवारी पुद्दुचेरीचे  आरोग्य मंत्री मल्लाडी कृष्णा राव (Malladi Krishna Rao) यांनी चक्क एका कोविड रुग्णालयातील शौचालय स्वच्छ केले. झालं असं की, मल्लाडी कृष्णा राज्यातील कोविड रुग्णालयांची परिस्थिती (inspection of COVID wards) जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर होते. ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Indira Gandhi Government Medical College and Hospital) आले असताना रुग्णांशी चर्चा करताना रुग्णांनी शौचालयाच्या अस्वच्छतेबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर लगेच त्यांनी क्लीनींग ब्रश आणि लीक्वीड आणायला सांगितले, आणि लगेच त्यांनी शौचालयाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली.  

सध्या पुद्दुचेरीच्या कोविड रुग्णालयांच्या एका वार्डात 75 रुग्ण आहेत आणि तिथं दिवसातून तीन वेळा स्वच्छतागृहे साफ केली जात असली तरी स्वच्छताविषयक कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने देखभाल करणे अवघड जात आहे. ही माहिती त्यांनी रुग्णांना दिली आणि त्यांनी तरुण रूग्णांना स्वच्छतागृहे वापरानंतर ती स्वतः स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही केले. सध्या राज्य सरकारकडे आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अडचणी येत असल्याचे, कृष्णा यांनी सांगितले. पुढील काही दिवसांतच राज्यात 458 नवीन आरोग्य कर्मचार्‍यांची भरती होणार असून त्यातील 80 जण 30 ऑगस्टपासून सेवेत रुजू होतील ही माहितीही आरोग्य मंत्री मल्लाडी कृष्णा यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com