
Madhya Pradesh
CM Mohan Yadav :
चार-पाच दिवसांपासून देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये कफच्या औषधामुळे नाहक काही बालकांचा जीव गेला आहे. त्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, छिंदवाडा कफ सिरप प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. राज्य सरकार या प्रकरणाबाबत पूर्णपणे सजग आणि संवेदनशील आहे, आणि मानवी जीवनाशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणतीही दुर्लक्ष सहन केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.