

मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परसमऊ निवासी वसतिगृहात साडेतेरा वर्षांच्या एका विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिला. या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर आणि निवासी वसतिगृहांच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर कारवाई करत वसतिगृह अधीक्षकाला निलंबित केले आहे. तर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.