

Woman Murder Brother In Law
ESakal
मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेवर तिच्याच दाजीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या खळबळजनक हत्येचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आरोपी निधी साहू, तिचा साथीदार साहिल पटेल आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. निधीने तिच्या दाजीच्या हत्येसाठी ५०,००० रुपयांचा करार दिल्याचे तपासात समोर आले आहे. सोशल मीडियावर सर्च करून तिने हत्येची पद्धत देखील शिकली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.