

Madhya Pradesh
sakal prime deals
देशात सर्वात आधी लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यास मध्य प्रदेश सरकारने सुरूवात केली. या स्कीमचा त्यांना अधिक फायदा झाला. आता मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही ही योजना सुरू ठेवली आहे. त्याबद्दलच त्यांनी अधिक माहिती दिली.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव सोमवारी इंदौर दौऱ्यावर होते. त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. समरसता परिषदांनाही भेट दिली. त्यांनी शहराच्या विविध भागांमध्ये ६४ कोटी रुपयांच्या खर्चाने होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजनही केले.
मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, आम्ही आमच्या संकल्पपत्रातील कामे पूर्ण करत आहोत. आम्ही जे सांगितले ते केले. आम्ही आमच्या बहिणींना दीड हजार रुपये देणे सुरू केले आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इथल्या काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले की “लाडली बहिणींना पैसे देऊ नका, त्या दारू पितात.” माहित नाही, त्यांची रात्र उतरली की नाही — लोक तसे म्हणतात.