esakal | राहुल गांधी इतक्या चांगल्या दर्जाची नशा कुठं करतात? भाजप मंत्र्याचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi 123.jpg

'दहा दिवसांत कर्जमाफी, 15 मिनिटांत चीनला माघार घ्यायला लावणारे वक्तव्य राहुल गांधी करतात. मी त्या गुरुंना नमन करतो, ज्यांनी त्यांना शिकवलं'

राहुल गांधी इतक्या चांगल्या दर्जाची नशा कुठं करतात? भाजप मंत्र्याचा सवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोपाळ- दहा दिवसांत कर्जमाफी, 15 मिनिटांत चीनला माघार घ्यायला लावणारे वक्तव्य राहुल गांधी करतात. मी त्या गुरुंना नमन करतो, ज्यांनी त्यांना शिकवलं, अशी उपरोधिक टीका भाजप नेते तथा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली आहे. 

राहुल गांधी यांनी नुकताच झालेल्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनावेळी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास 15 मिनिटांत चीनला भारतीय भूमीतून माघार घ्यायला लावू असे वक्तव्य केले होते. पंतप्रधान स्वत:ला देशभक्त म्हणवतात पण चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसलं आहे. मग हे कसले देशभक्त? असा सवाल करत राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार मिश्रा यांनी घेतला.

राहुल गांधी इतक्या चांगल्या दर्जाची नशा कुठे करतात, अशी टीकाही त्यांनी केली. 

गतवर्षी मध्य प्रदेश, कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी त्यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर 10 दिवसांत कर्जमाफी करु असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या आश्वसनावर भाजपने मोठी टीका केली होती. 

हेही वाचा- 'माझ्या ट्रॅक्टरवरील सोफा दिसतो पण पंतप्रधानांसाठीच्या आलिशान विमानाबाबत कोण बोलणार?'

'किसान बचाओ' रॅली दरम्यान ट्रॅक्टरवर लावलेल्या गादीवरुन आता राहुल गांधींवर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. राहुल गांधींनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी घेतलेल्या विमानावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांना माझ्या ट्रॅक्टरवरील सोफा दिसला पण करदात्यांच्या पैशातून 8 हजार कोटी रुपयांत खरेदी केलेल्या आरामदायी आणि आलिशान एअर इंडियाचे विमान दिसत नाहीत का, असा सवाल त्यांनी केला आहे.

loading image