esakal | 'माझ्या ट्रॅक्टरवरील सोफा दिसतो पण पंतप्रधानांसाठीच्या आलिशान विमानाबाबत कोण बोलणार?'
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi main.jpg

जे विमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. तसेच विमान मोदी यांना हवं आहे. ज्यावर लोकांचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. बोईंग विमान खरेदी करण्यासाठी इतकी मोठी रक्कम दिली जात आहे.

'माझ्या ट्रॅक्टरवरील सोफा दिसतो पण पंतप्रधानांसाठीच्या आलिशान विमानाबाबत कोण बोलणार?'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन राहुल गांधी मोदी सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. 'किसान बचाओ' रॅली दरम्यान ट्रॅक्टरवर लावलेल्या गादीवरुन आता राहुल गांधींवर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. राहुल गांधींनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी घेतलेल्या विमानावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांना माझ्या ट्रॅक्टरवरील सोफा दिसला पण करदात्यांच्या पैशातून 8 हजार कोटी रुपयांत खरेदी केलेल्या आरामदायी आणि आलिशान एअर इंडियाचे विमान दिसत नाहीत का, असा सवाल त्यांनी केला आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रॅक्टरवरील गादीवरुन विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींसाठी खरेदी करण्यात आलेल्या महागड्या आणि लक्जरी विमानाबाबत प्रश्न का विचारला जात नाही. त्यामध्ये एक नव्हे तर अनेक पलंगं असतील. मोदींनी हजारो कोटीत ते विमान खरेदी केले आहे. 

हेही वाचा- कोणत्या हंगामात काय पिकतं हे तरी माहिती आहे का?, नक्वींचा राहुल गांधींना टोला 

जे विमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. तसेच विमान मोदी यांना हवं आहे. ज्यावर लोकांचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. बोईंग विमान खरेदी करण्यासाठी इतकी मोठी रक्कम दिली जात आहे. याबाबत त्यांना कोणी प्रश्न विचारताना दिसत नाही. पण सर्वांना माझ्या ट्रॅक्टरवरील सोफ्याबाबतच प्रश्न निर्माण होत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. 

हेही वाचा- खूशखबर! सॅमसंग, फॉक्सकॉनसह 16 कंपन्यांना भारतात मोबाइल उत्पादनास परवानगी

दरम्यान, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेतून एअर इंडिया वन विमान खरेदी करण्यात आले आहे. या विमानांसाठी भारताने 2018 मध्ये बोईंग कंपनीशी करार केला होता.