MP : बलात्काऱ्यांना भरचौकात फाशी द्या, त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करू नका; भाजपा मंत्र्याचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Usha Thakur Khandwa Madhya Pradesh

खांडवा इथं चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. बेशुद्ध अवस्थेत ती शेतात आढळलीय.

MP : बलात्काऱ्यांना भरचौकात फाशी द्या, त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करू नका; भाजपा मंत्र्याचं विधान

मध्य प्रदेशातील खांडवा (Khandwa Madhya Pradesh) इथं एका 4 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी मंत्री उषा ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. मध्य प्रदेशातील शिवराज सरकारमधील मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी बलात्कार करणाऱ्याला चौकाचौकात फाशी देण्याची मागणी करत अशा लोकांवर अंत्यसंस्कारही करू नयेत, असं म्हटलंय.

1 नोव्हेंबरला खांडवा इथं एका 4 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. यामध्ये 25 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आलीय. पत्रकारांशी बोलताना मंत्री ठाकूर म्हणाल्या, 'मध्य प्रदेश सरकार अशा क्रूर घटकांचा कठोरपणे सामना करत आहे. बलात्काऱ्यांना फाशीची तरतूद असणारं हे पहिलं राज्य आहे. आतापर्यंत अशा 72 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आलीय. अशा लोकांना फाशी दिल्यानंतर त्यांचे मृतदेह चौकाचौकात लटकवायला हवेत. म्हणजे गरुड, कावळे त्यांच्या मृतदेहाचे लचके तोडतील, जेणे करुन मुलींना हात लावायची कोणाची हिंमत होणार नाही.'

हेही वाचा: 'तेरे बिना मरजावां !' प्रेयसीच्या घरासमोर रील बनवून तरुणाची आत्महत्या

दरम्यान, रात्री मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी सांगितलं की, रात्री एक व्यक्ती घरात खाट मागण्यासाठी आली होती. संशयिताचं नाव राजकुमार असून तो रात्री या कुटुंबाकडं खाट मागण्यासाठी आला होता, असं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 363 (अपहरण), 376 (बलात्कार) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला आहे.

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे