Madhya Pradesh Accident
ESakal
मध्य प्रदेश सागर जिल्ह्यातील देवरी राष्ट्रीय महामार्ग ४४वर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या मार्गावर एका एर्टिगा कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.