सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी मागे घ्यावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

भाजप महिला आमदाराची अर्थमंत्र्यांकडे मागणी

सागर (मध्य प्रदेश) : सॅनिटरी नॅपकिनवर वस्तू व सेवाकर (जीएसटी) 12 टक्के आकारण्यात येत असून, तो मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार पारुल साहू यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

मध्य प्रदेशातील सुर्खी मतदारसंघाच्या आमदार साहू यांनी याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना दोन दिवसांपूर्वी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की देशातील ग्रामीण भागातील बहुतांश महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरणे परवडत नाही. यातच त्यावर 12 टक्के जीएसटी लावण्यात आला असून, ग्रामीण आणि निमनागरी भागातील महिलांसाठी आणखी बिकट परिस्थिती होणार आहे. सरकार महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यावरील कर सरकार मागे घेईल, अशी अपेक्षा मला आहे. दरम्यान, याआधी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि निर्माती एकता कपूर यांनी सॅनिटरी नॅपकिनवरील जीसएटीविरोधात टीका केली होती.

आधीएवढीच कर
सॅनिटरी नॅपकिनवर आधी एवढाच अथवा त्यापेक्षा कमी कर असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. जीएसटी लागू होण्याआधी सॅनिटरी नॅपकिनवर सलवतीचे 6 टक्के उत्पादनशुल्क आणि 5 टक्के मूल्यवर्धित कर आणि उपकर असा एकूण 13.68 टक्के कर होता. आता सॅनिटरी नॅपकिनवर 12 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे.

Web Title: madhya pradesh news sanitary napkins and gst