भोपाळ : मध्य प्रदेशात ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण (Madhya Pradesh OBC Reservation) देण्याच्या प्रश्नावर भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. गुरुवारी भोपाळ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या संदर्भात संयुक्त ठराव मंजूर करण्यात आला.