esakal | भाजप नेत्याच्या कानशिलात लगाविल्याने महिला उपजिल्हाधिकारी ट्रेंडमध्ये

बोलून बातमी शोधा

Priya Verma

केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए विरोधात विविध संघटनांकडून मोर्चे निघत असताना, त्याच्या समर्थनार्थही भाजप कार्यकर्त्यांकडून मोर्चे काढण्यात येत आहेत. अशाच प्रकारे मध्य प्रदेशातील राजगढ येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोर्चेकऱ्यांकडून भारत माता की जय घोषणा देण्यात येत होत्या.

भाजप नेत्याच्या कानशिलात लगाविल्याने महिला उपजिल्हाधिकारी ट्रेंडमध्ये
sakal_logo
By
वृत्तसंस्था

राजगढ : मध्य प्रदेशातील राजगढ येथे रविवारी नागरिकत्व सुधारणा कायद्या (सीएए) समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात भाजप कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांना भाजप कार्यकर्त्यांना केस पकडून ढकलाढकली केल्यानंतर त्यांनी एका भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या कृतीचे कौतुक होत असून, #प्रियावर्माजिंदाबाद हा ट्विटरवर ट्रेंड सुरु आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए विरोधात विविध संघटनांकडून मोर्चे निघत असताना, त्याच्या समर्थनार्थही भाजप कार्यकर्त्यांकडून मोर्चे काढण्यात येत आहेत. अशाच प्रकारे मध्य प्रदेशातील राजगढ येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोर्चेकऱ्यांकडून भारत माता की जय घोषणा देण्यात येत होत्या. या मार्चाला नियंत्रित करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी प्रिया वर्माही उपस्थित होत्या.

पोलिसांचा "सायवॉर'शी लढा! 

मोर्चादरम्यान आंदोलकांना रोखण्यासाठी प्रिया वर्मा गेल्यानंतर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांचे केसही ओढण्यात आले. त्यावेळी त्यांनीही मागे न राहता थेट जमावात घुसून एका कार्यकर्त्याला ढकलून दिले. तसेच एका नेत्याच्या कानशिलातही लगाविल्या. त्यानंतर जमाव आणखी आक्रमक झाला. अखेर त्यांना पोलिस संरक्षणात तेथून हलविण्यात आले. 

मध्य प्रदेशात यापूर्वीही इन्दौरमध्ये सीएए विरोधात आंदोलन झाले होते. इन्दौरमधील बडवाली पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या.