Viral News: दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीला तरूणाकडून बेदम मारहाण

दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीला बेदम मारहाण केली.
crime news
crime newsEsakal

प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणणारे प्रेमवीर मन बदलले की प्रेमाचा तिरस्कार करायला ही मागे पुढे पाहत नाहीत. तिन वर्षापूर्वी प्रेम विवाह करणाऱ्या मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाममधील (Ratlam) एका तरुणाने दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीला बेदम मारहाण केली. यात तिच्या डोक्याला व पोटाला जखमा झाल्या. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारीनंतर पोलिसांनी दीपक आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोणालाही अजून अटक करण्यात आलेली नाही. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

3 वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता

रतलामच्या कस्तुरबा नगरमध्ये राहणाऱ्या महिलेने तीन वर्षांपूर्वी जवाहर नगरमध्ये राहणाऱ्या दीपक टांकसोबत प्रेमविवाह केला होता. दीपक एका खासगी कंपनीत काम करतो. त्याची पत्नीही त्याच्या कंपनीत काम करायची. यादरम्यान दोघांची भेट झाली आणि दोघांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले. लग्नानंतर दीपकने घर सोडले आणि जवाहरनगरमध्ये भाड्याने राहू लागला. काही महिन्यांनी पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर दीपक तीन महिन्यांपूर्वी घरी परतला. या वादाला कंटाळून दीपक तीन महिन्यापूर्वीच स्वत:च्या घरी निघून गेला.

crime news
दहा मार्चला यूपीत विजयासह पहिली होळी साजरी करणार-नरेंद्र मोदी

काही दिवसापूर्वीच दीपकचा साखरपूडा झाला. हे जेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीला समजले तेव्हा तिने सासरी जाऊन याचा जाब विचारला. यावेळी सासु सोबत तिची तू-तू-मै-मै झाली. दरम्यान दीपक घटनास्थळी पोहचला आणि त्याने पत्नीला बाहेर घेऊन गेला. संतापलेल्या दीपकने भर रस्त्यातच मारायला सुरुवात केली. त्याने तिला इतके मारले की डोक्याला व पोटाला जखमा झाल्या यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारीनंतर पोलिसांनी दीपक आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोणालाही अजून अटक करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com