बाराशे रुपये कमावणार सेल्समन करोडपती

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

भोपाळ - दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असं म्हणतात. अशीच एक घटना भोपळ मधे घडल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशमधल्या सिद्धी जिल्ह्यातील रहिवासी 'सुरेश प्रसाद पांडे'  हा फक्त बाराशे रुपये कमावणारा सेल्समन  करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे. लोकायुक्तने केलेल्या कारवाईमध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली. 

लोकायुक्तचे अधिकारी सुरेंद्र सिंह आणि देवेश पाठक यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे सेल्समन सुरेश पांडे कमवत असलेल्या रक्कमेपेक्षा 200 पट संपत्ती त्याच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे. 

पाडेंच्या घरावर टाकलेल्या छाप्यामध्ये सापडलेली मालमत्ता
- कोट्यवधींची बेहिशेबी कॅश
- चार वाहने
- सोन्याचे दागिने
- याशिवाय स्वत:च्या,पत्निच्या आणि मुलाच्या नावावर असलेली आठ बँकांमध्ये खाती आहेत

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना, बेहिशेबी मालमत्तेबाबत आलेल्या तक्रारींनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लोकायुक्त अधिका-यांनी दिली. अजून ही कारवाई संपलेली नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

Web Title: Madhya Pradesh salesman with Rs 1,200 pay is a crorepati