
Madhya Pradesh
esakal
मध्यप्रदेश राज्याला ऐतिहासिक वारसा आहे. मध्य प्रदेशमध्ये खजुराहो, सांची स्तूप आणि भीमबेटका रॉक शेल्टर्स ही आहेत, जी युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. या व्यतिरीक्त अनेक अभयारण्येही आहेत. आता याच गोष्टींवर फोकस करून राज्यातील पर्यटन व्यवस्था विकसित करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शनिवारी मध्यप्रदेश ट्रॅव्हल मार्टच्या निमित्ताने कुशाभाऊ ठाकरे सभागृहात पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूकदार, चित्रपट निर्माते आणि कलाकारांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.