esakal | पर्यटकांचा पत्ता नाही! 'खजुराहो' बनतंय डेस्टिनेशन वेडिंगचं स्थळ
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांचा पत्ता नाही! 'खजुराहो' बनतंय डेस्टिनेशन वेडिंगचं स्थळ

पर्यटकांचा पत्ता नाही! 'खजुराहो' बनतंय डेस्टिनेशन वेडिंगचं स्थळ

sakal_logo
By
दीनानाथ परब

भोपाळ: जागतिक वारसास्थळांमध्ये मोडणाऱ्या 'खजुराहो'कडे (Khajuraho) मागच्या १६ महिन्यात फारसे पर्यटक फिरकलेले नाहीत. आता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हेच खजुराहो स्वत:ला वेडिंग डेस्टिनेशन म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न करतय. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर (corona second wave) अनलॉकची (unlock) प्रक्रिया सुरु झाली, तेव्हापासून आतापर्यंत खजुराहोमध्ये ५० विवाह झाले आहेत. (Madhya Pradesh Tourists missing म turns into destination wedding site dmp82)

'खजुराहो'मधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ५० पाहुण्यांची दोन रात्रीची निवासाची सोय करण्यात येते. त्याचा खर्च ८ ते १० लाख रुपये आहे. पारंपारिक विधी, जेवण या सर्वाचा त्या पॅकेजमध्ये समावेश आहे. उत्पन्न कमावण्याच्या या नव्या मार्गाने खजुराहोमधील हॉटेल उद्योगाला दिलासा मिळाला आहे. कारण मागच्यावर्षी कोरोनामुळे लॉकडाउन लागला. त्यानंतर या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाकडे परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवली. सध्या इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. पण डेस्टिनेश वेडिंगने इथल्या हॉटेल उद्योगाला हात दिला आहे.

हेही वाचा: 'सामना'मध्ये हेडलाईन येईल "आमचीच लाल आमचीच लाल"; मनसेचा टोला

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून अनेक कुटुंब जूनच्या पहिल्या आठवड्यापासून 'खजुराहो'मध्ये विवाहासाठी येत आहेत. दुसऱ्या लाटेनंतर मध्य प्रदेश सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. तेव्हापासून डेस्टिनेशन वेडिंगलाठी 'खजुराहो'ला पसंती दिली जातेय. "आलिशान हॉटेलमध्ये विवाह सोहळा संस्मरणीय असतो. आम्ही फक्त ५० पाहुणे मंडळी होतो. पण आम्ही सोहळ्याचा खूप आनंद लुटला" असे या विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या रितेश श्रीवास्तव यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलेय.

हेही वाचा: उल्हासनगर: ४ वर्षांचा रूद्र लघुशंकेला गेला अन् पावसाने घात केला

मागच्या १६ महिन्यात खजुराहोमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटल्याने हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला आहे. शेकडो लोकांनी नोकऱ्या गमावल्या. हॉटेलमध्ये आता ६० ते ७० टक्के लोक नोकरी करतायत. खजुराहोमधील ३-४ स्टार हॉटेल्स बंद होण्याचा धोका आहे.

loading image