धुक्यामुळे धावपट्टी न दिसल्याने विमान कोसळून मुंबईचे दोन वैमानिक ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 4 जानेवारी 2020

वैमानिकांपैकी अशोक मकवाना हे प्रशिक्षक होते, तर पीयूष चंदेल हा प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. हे दोघेही मुंबईचे रहिवासी होते. "चाइम्स ऍकॅडमी' या वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीच्या प्रशिक्षण विमानाने काल रात्री धाना येथून आठच्या सुमारास उड्डाण केले होते.

भोपाळ : मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील धाना हवाई धावपट्टीवर प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार विमान शुक्रवारी (ता. 3) रात्री शेतात पडले. यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वैमानिकांपैकी अशोक मकवाना हे प्रशिक्षक होते, तर पीयूष चंदेल हा प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. हे दोघेही मुंबईचे रहिवासी होते. "चाइम्स ऍकॅडमी' या वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीच्या प्रशिक्षण विमानाने काल रात्री धाना येथून आठच्या सुमारास उड्डाण केले होते. अर्ध्या तासानंतर विमान उतरण्याच्या वेळी धुक्‍यामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही आणि विमान 80-100 मीटर दूर शेतात कोसळले, अशी माहिती सागरचे पोलिस अधीक्षक अमित संघी यांनी दिली.

पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ

विमानाचे उड्डाण केल्यानंतर काही वेळातच दाट धुके पडेल, असा अंदाज प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी वैमानिकाला आला नाही, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. "सेसना 172' या विमानाला काचेचे कॉकपीट असून, रात्री उड्डाण करण्याची सोय आहे, असे "चाइम्स'चे स्थानिक प्रशासक राहुल शर्मा यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्या वैमानिकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन ट्विटरवरील शोकसंदेशातून केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh Trainer airplane crash-lands in field 2 killed