पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ

वृत्तसंस्था
शनिवार, 4 जानेवारी 2020

पाँडिचेरीमध्ये ही घटना घडली असून, मंत्र्याने बसने केलेल्या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पेट्रोल पंपावर सरकारची उधारी शिल्लक असल्याने पंपचालकाने चक्क मंत्र्यांच्या गाडीत पेट्रोल भरण्यास नकार दिला.

पाँडिचेरी : पेट्रोल पंप चालकाने सरकारकडे माझी उधारी असून, उधारी नाही दिली तर गाडीत पेट्रोल भरणार नाही अशी भूमिका घेतल्याने एका मंत्र्याला चक्क गाडी सोडून बसने प्रवास करावा लागल्याची घटना घडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाँडिचेरीमध्ये ही घटना घडली असून, मंत्र्याने बसने केलेल्या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पेट्रोल पंपावर सरकारची उधारी शिल्लक असल्याने पंपचालकाने चक्क मंत्र्यांच्या गाडीत पेट्रोल भरण्यास नकार दिला. यामुळे मंत्र्यांना चक्क बसने प्रवास करावा लागला. कृषीमंत्री आर. कमलाकन्नन यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. कारण सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोलचे पैसे दिले नव्हते.

उद्धव ठाकरेंना पहिला धक्का; अब्दुल सत्तार यांनी दिला राजीनामा

कमलाकन्नन हे शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कराईकल इथून पाँडिचेरीला जात होते. त्यांच्या कारने जाण्याचे नियोजन होते पण त्यात पेट्रोल नसल्याने पंपावर गेले. त्या ठिकाणी पंपावर त्यांना पेट्रोल देण्यास नकार देण्यात आला. कारण पेंट्रोल पंपांना सरकार अडीच कोटी रुपये देणे बाकी आहे. यातील जवळपास 50 लाख रुपये हे मंत्र्यांचे आहेत. पेट्रोल पंपांनी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही दिलेले नाही, असे सांगून पेट्रोल भरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर बसने प्रवास करण्याची वेळ आली. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहण्यासाठी तीन तासांचा प्रवास केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Puducherry Minister takes bus for cabinet meeting after being denied fuel on credit