

उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू होऊन आठवड्याभराचा कालावधी झाला. महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आणि साधु-संत प्रयागराजमध्ये दाखळ झाले आहेत. यात वयाची १२८ वर्षे पूर्ण केलेले स्वामी शिवानंद बाबा हेसुद्धा आहेत. गेल्या १०० वर्षांपासून प्रत्येक कुंभ मेळ्यात ते सहभागी झाले आहेत. यावेळी महाकुंभ मेळ्यातही स्वामी शिवानंद त्यांच्या शिष्यांसह आले आहेत. ४० दिवस याठिकाणी ते साधना करणार आहेत. शिवानंद बाबा यांना २१ मार्च २०२२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलंय.