80 Voters Registered at One Address Explained : राहुल गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बंगलुरू सेंट्रलमधील मुनी रेड्डी गार्डन येथील 10 बाय 15 चौरस फुटांच्या छोट्या घरात 80 मतदार नोंदणीकृत असल्याचा दावा त्यांनी केला होता. राहुल गांधींच्या या आरोपावर आता यावर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मुनीरत्न यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी म्हणतात ते खरं आहे, पण पूर्ण सत्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.