esakal | बॅनर्जींच्या माता सीतेवरील वक्तव्याने संतांमध्ये आक्रोश; शीर कापणाऱ्याला 5 कोटींचे बक्षीस
sakal

बोलून बातमी शोधा

paramdas.

तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी टीएमसी खासदारावर रासुका लावण्याची मागणी केली आहे.

बॅनर्जींच्या माता सीतेवरील वक्तव्याने संतांमध्ये आक्रोश; शीर कापणाऱ्याला 5 कोटींचे बक्षीस

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- नुकतेच पश्चिम बंगालमधील तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि व्यवस्थेवर भाष्य करत सीता देवीवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अयोध्येच्या संतांमध्ये नाराजी आहे. तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी टीएमसी खासदारावर रासुका लावण्याची मागणी केली आहे. रासुका लावला नाही तर त्यांचे शीर धडापासून वेगळे करण्यासाठी 5 कोटी रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

पश्चिम बंगालच्या निवडणुक प्रचारादरम्यान तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशच्या कायदे व्यवस्थेवर भाष्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतांमध्ये आक्रोश होता. अयोध्येचे महंत परमहंस दास यांनी कल्याण बॅनर्जी यांना राक्षण ठरवून टाकलं, तसेच त्यांच्यावर रासूका लावण्याची मागणी केली. 

सीता देवीवर केलेली टिप्पणी अक्षम्य 

राम मंदिर निर्माणासाठी आमरण उपोषणाच्या चर्चेसाठी आलेले संत परमहंस दास यांनी म्हटलं की, कल्याण बॅनर्जी यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई व्हायला हवी, अन्यथा संतांनाही धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्रं घ्यावे लागतील. माता सीतेवरील कोणतीही टिप्पणी अक्षम्य आहे. परमहंस दास पुढे म्हणाले की, कल्याण बॅनर्जी यांच्यावर कारवाई झाली नाही, तर त्यांच्या शीर कापणाऱ्याला 5 कोटींचे बक्षीस देण्यात येईल. राजकारणासाठी देवी-देवतांचा अपमान होत आहे, यावर तात्काळ रोक लागली पाहिजे. 

इंडिगो पायलटच्या हत्येने हादरला बिहार; 'राज्य सांभाळणं कठीण झालेल्या CM नी...

दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. भाजपने राज्यात जोर लागला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालचा दौरा केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्ता टिकवण्याचे मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 


 

loading image