इंडिगो पायलटच्या हत्येने हादरला बिहार; 'राज्य सांभाळणं कठीण झालेल्या CM नी द्यावा राजीनामा'

Bihar Indigo Pilot killed
Bihar Indigo Pilot killed

पाटणा : बिहारमध्ये पाटणा शहरात काल मंगळवारी संध्याकाळी इंडिगो एअरलाईन्सच्या रुपेश कुमार सिंह या स्टेशन मॅनेजरची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. विरोधक नितीश कुमारांकडून राजीनाम्याची मागणी करत आहेत. रुपेश हत्याकांडाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्याता आली आहे.  

इंडिगोच्या सिनीयर मॅनेजरला पाटणामध्ये त्यांच्या घराच्या बाहेरच दिवसाढवळ्या गोळीने उडवण्यात आलं होतं. पाटणातील पुनाईचाक भागातील कुसुम विलास अपार्टमेंट येथे संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इंडिगो एअरपोर्ट मॅनेजर असलेले रुपेश कुमार विमानतळावरून घरी येत होते. त्याची कार कॉलनीच्या गेटजवळ येतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. आरोपींनी कुमार यांच्या दिशेने तब्बल सहा राऊंड फायर केले. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. 

माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आज बुधवारी सकाळी ट्विट करुन नितीश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तेजस्वी यादवांनी म्हटलंय की, अनैतिक आणि अवैध सरकारच्या संरक्षणार्थ गुन्ह्यांची आणि दुष्कर्मांची दररोज वाढती संख्या हे NDA सरकारचे सामुहिक अपयश आहे. नितीश कुमारांकडून राज्यात घडणारे गुन्हे लपवणे आणि त्यांचा स्विकारच न करणे  हाच मोठा गुन्हा आहे तसेच अपराध्यांसाठी मोकळीक आहे. त्यांच्याकडून बिहारला सांभाळणे कठीण होत आहे, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.

सीबीआय तपासाची मागणी
इंडिगोच्या स्टेशनवर मॅनेजर रुपेश कुमार सिंहच्या हत्येनंतर बिहारमध्ये वातावरण तापले आहे. पप्पू यादव यांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे. तर भाजपाचे खासदार विवेक ठाकूर यांनी आपल्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विवेक ठाकूर यांनी म्हटलंय की, एकतर बिहार सरकारने 3 ते 5 दिवसांदरम्यान गुन्हेगारांना पकडावं अथवा हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com