गुन्ह्यांच्या तपासातही महाराष्ट्र आघाडीवर; 11 पोलिसांना MHA पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MHA Awards

गुन्ह्यांच्या तपासातही महाराष्ट्र आघाडीवर; राज्यातील 11 पोलिसांना MHA पुरस्कार प्रदान

तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देशभरातील 151 पोलीस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक (MHA पुरस्कार 2022) प्रदान करण्यात आले. एमएचए पुरस्कार विजेत्यांमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मधील 15, महाराष्ट्र पोलिसांचे 11, मध्य प्रदेश पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे प्रत्येकी 10, केरळ पोलिस, राजस्थान पोलिस आणि पश्चिम बंगाल पोलिसांचे आठ जणांचा समावेश आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये 28 महिला पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

2018 मध्ये गुन्ह्याच्या तपासाच्या मानकांना चालना देण्यासाठी आणि तपासातील अशा उत्कृष्टतेला मान्यता देण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री पदक अन्वेषणातील उत्कृष्टतेची स्थापना करण्यात आली. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी याची घोषणा केली जाते. उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार केंद्रीय तपास यंत्रणा, राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील सदस्यांना त्यांच्या तपासातील उत्कृष्ट सेवेसाठी दिला जातो. त्यासाठी हेडकॉन्स्टेबलपासून ते पोलिस अधीक्षकांपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरण्यास सांगितले जाते.

वर्ष 2021 साठी, 152 पोलीस कर्मचार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्ट तपासासाठी प्रदान करण्यात आले. 2021 मध्ये हे पुरस्कार मिळालेल्या कर्मचार्‍यांमध्ये सीबीआयचे 15, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांचे प्रत्येकी 11, उत्तर प्रदेशचे 10, केरळ आणि राजस्थान पोलिसांचे नऊ, तामिळनाडू पोलिसांचे आठ, बिहारचे सात, गुजरातमधील प्रत्येकी सहा पोलिस, कर्मचारी सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील या 11 पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाला पुरस्कार

1) कृष्ण कांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त

2) प्रमोद भास्करराव तोरडमल, पोलिस निरीक्षक

3) मनोज मोहन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक

4) दिलीप शिशुपाल पवार, पोलिस निरीक्षक

5) अशोक तानाजी विरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी

6) अजित भागवत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी

7) राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक

8) दीपशिखा दीपक वारे, पोलिस निरीक्षक

9) सुरेशकुमार नानासाहेब राऊत, पोलिस निरीक्षक

10) जितेंद्र बोडप्पा वनकोटी, पोलिस निरीक्षक

11) समीर सुरेश अहिरराव, पोलिस निरीक्षक

Web Title: Maharashtra Also Leads The Investigation Of Crimes 11 Policemen Conferred With Mha Awards

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..