योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाराला मुंबईतून अटक

Maharashtra ATS arrests 25-year-old man for threatening to kill UP CM Yogi Adityanath
Maharashtra ATS arrests 25-year-old man for threatening to kill UP CM Yogi Adityanath

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला महाराष्ट्र एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. कामरान अमीन असं या आरोपीचं नाव असून एटीएसच्या काळाचौकी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. हा युवक २५ वर्षांचा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आरोपील पकडण्यात असं आलं यश
आरोपीने धमकीचा फोन केल्यानंतर आपला मोबाईल बंद ठेवला होता. मात्र, तांत्रिक सहाय्याच्या आधारावर पोलिसांनी हा फोन मुंबईच्या चुनाभट्टी भागात शेवटचा स्विच ऑन केला गेला होता हे शोधून काढलं. यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात तपास केला असता, कामरान अमिनचं नाव समोर आलं. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कामरानला अटक केली आहे.
----------
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?
---------
हिंमतवान ज्योतीला ट्रम्प कन्येचा सलाम
---------
कामरानने उत्तर प्रदेश सरकारच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन करुन, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्ब हल्ल्यात मारलं जाणार आहे अशी धमकी दिली. यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी लखनऊ मधील गोमती नगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने तपास केला असता ज्या मोबाईल नंबरवरुन धमकीचा फोन करण्यात आला तो मुंबईतला असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देण्यात आली.

दरम्यान आरोपी कामरानने आपला एटीएस अधिकाऱ्यांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. आज (ता. २४) रविवारी त्याला न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर कामरानला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com