

National Security Alert: Maharashtra ATS Raids Multiple Locations Over Pakistan Links
esakal
पुणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींविरोधात राज्यभरात मोठी छापेमारी सुरू केली आहे. बुधवारी सकाळपासून विविध ठिकाणी मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील ५७ संशयितांपैकी पुण्यातील चौघेजण शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.