Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi: आज विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा चार जागांचा निकाल लागणार आहे. तसेच, संसदेचे अधिवेशन सुरु आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊ शकतात.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

Union minister Giriraj Singh live : राहुल गांधींना हिंदू वेगवेगळ्या धर्मांशी संबंधित - गिरिराज सिंह

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणतात, "राहुल गांधींना ते कोण आहेत हे देखील माहित नाही... ते वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या धर्मांशी संबंधित आहेत... त्यामुळे त्यांना हिंदू आवडत नाहीत."

Devendra Fadanvis Live: दीक्षाभूमीचा आराखडा स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला - देवेंद्र फडणवीस

दीक्षाभूमीचा आराखडा स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. राज्य सरकार हा केवळ आर्थिक मदत पुरवत आहे. काही कोणाचे आक्षेप असतील तर ते ऐकून घेतले पाहिजे म्हणून स्थगिती दिली पाहिजे. स्मारक समिती आणि आंदोलक यांनी मार्ग काढावा, कुठे काय बनवलं पाहिजे यात आमचा कुठलाही आग्रह नाही. हे सगळ स्मारक समितीने ठरवले आहे. आपसात बसून त्यांनी निर्णय केला पाहिजे...जे काही त्यांचं म्हणणं असेल राज्य सरकार ते मान्य करेल. आराखडा तयार करताना सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे कोणाच्याही मनात जर शंका असेल तर शेवटी हे राष्ट्रीय स्मारक आहे जगभरातील लोक इथे येतात. त्यामुळे कोणाच्या मनात शंका आणि विरोध ठेवून हे काम करता येणार नाही. परंतु सगळ्यांच्या शंकांचा समाधान होऊन आराखडा तयार होणार नाही तोपर्यंत कुठल्याही काम त्याठिकाणी करण्यात येणार नाही.

अकरावीच्या परीक्षा घोळाची चौकशी होणार - केसरकर

अकरावी प्रवेश प्रक्रिया घोळावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सगळं प्रकरण तपासून पाहिलं जाईल, कोणाच्या बाबतीत दुजाभाव केला जाणार नाही. मी या सर्व प्रकरणाची चौकशी करेन. कोणाचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी केसरकर यांनी दिली.

Mumbai Live: कल्याण पूर्वमध्ये एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

कल्याण पूर्व 100 फुटी चौक परिसरातील एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. संदीप राठोड असे जखमी तरुणाचे नाव आहे. चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Maharashtra News Live Updates : भारतीय न्याय संहितेअंतर्गत राज्यभरात पाच वाजेपर्यंत ७३ गुन्ह्यांची नोंद

भारतीय न्याय संहितेअंतर्गत राज्यभरात पाच वाजेपर्यंत ७३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. BNS अंतर्गत पहिला गुन्हा मुंबईच्या डी बी मार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. आज पासून भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष संहिता (BSA) हे तीन नवे कायदे अमलात आले आहेत, ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता, १८६० (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (CrPC) आणि भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२ कायद्यांच्या जागी नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू आहे.

Devendra Fadanvis Live: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं तुकोबांच्या पालखीचं दर्शन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे.

Anil Parab Live: मतदार पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब विजयी

मतदार पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब विजयी झाले आहेत.

Chandrahekhar Bawankule Live: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून आजारी होत्या. स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पती कृष्णराव, चार मुले, सूना, नातवंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Mansoon session Live:  दानवेंकडून प्रसाद लाड यांना शिवीगाळ, सभागृहात गोंधळ

MLC Election Voting : मुंबई शिक्षक मतदारसंघात दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु, दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर

शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचे ज मो अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या चुरशीची लढत. दुसऱ्या फेरीतही दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर आहे.

Lonavala Live : लोणावळ्यात सायंकाळी ६ नंतर पर्यटकांना बंदी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये नुकतेच ५ जण वाहून गेल्याची दुर्घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळ्यात सायंकाळी ६ नंतर पर्यटकांना बंदी घातली आहे. लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याचअनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत. संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलंय. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे. असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलंय. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

Kolhapur Live : कोल्हापुरमधील दूधगंगा नदीमध्ये २ जण बुडाले

पावसाळी पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोघे जण दूधगंगा नदीत बुडाले आहेत. घटनास्थळी पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे.

Shivsena Ncp MP Meet Pm Modi : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्याबद्दल शिवसेना खासदारांनी आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Uday Samant : अनधिकृत झोपडपट्ट्यांची चौकशी होणार - उदय सामंत

राज्यातील अनधिकृत झोपडपट्ट्यांची चौकशी होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी विधानपरिषदेमध्ये दिली आहे.

Vidhanparishad Election : विधानपरिषदेसाठी भाजपची ५ नावांची यादी जाहीर

विधानपरिषदेसाठी भाजपकडून ५ नावांची यादी जाहीर करण्यात आली असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली आहे.

MPSC मार्फत होणाऱ्या आजच्या परीक्षा TCS कडून रद्द 

पुढील तारीख लवकर कळणार आहेत. पण विद्यार्थी आपल्या भूमिकावर ठांब आहे. परीक्षा आजच झाली पाहीजे.

Nagpur Deeksha bhoomi Live: प्रस्तावित नसातानाही पार्किंगचा घाट- प्रकाश आंबेडकर

वंचित आंदोलकांच्या पाठीशी असल्याचे आंबेडकर म्हणाले आहे.

नागपुर दिक्षाभुमी ऐतिहासिक धरोहर- अंधारे

नागपुर दिक्षाभुमी परिसरातील मुद्दा तापला असून सर्व पक्षाचा विरोध आहे. या मुद्द्या कडे सर्वांना लक्ष देणे गरजेचे आहे.

Amit Shah Live : नवीन गुन्हेगारी कायद्यांतर्गत पहिल्या गुन्ह्यावर अमित शहा स्पष्ट बोलले

अमित शहा यांनी स्पष्ट केले की पहिला गुन्हा नवीन कायद्यांनुसार ग्वाल्हेरच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे. तो चोरीचा गुन्हा होता, कुणाची मोटारसायकल चोरीला गेली होती. हा गुन्हा सकाळी 12.10 वाजता नोंदवण्यात आला, दिल्लीत दाखल झालेला हा खटला नवीन कायद्यांतर्गत दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यांपैकी एक होता.

Ambadas Danave Live : खेळाडूंच्या अभिनंदनावर सभापतींनी बोलू न दिल्यामुळे विरोधकांनी केला सभात्याग

खेळाडूंच्या अभिनंदनावर विरोधी पक्षनेते यांना सभापती यांनी बोलू न दिल्यामुळे विधान परिषद सभागृहातून विरोधकांनी वॉक आउट करत सभात्याग केला.

Tamhini Ghat Live : सहलीसाठी ताम्हिणी घाटात गेलेला तरुण धबधब्यात गेला वाहून

ताम्हिणी घाटात एक तरुण धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या झालेल्या तरुणाचे नाव आहे हा तरुण आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नीलने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला.

MPSC Skill Test Exam Live : MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणी मधे तांत्रिक अडचण

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणाऱ्या कौशल्य चाचणी मधे तांत्रिक अडचण. लिपिक टंकलेखक 2023 साठी एमपीएससी ने 1 जुलै ते 13 जुलै कालावधीत कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. 1 जुलैला सकाळच्या पहिल्याच सत्रात विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. तसेच दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा 11:30 ते 12:30 वेळेत होती त्यांना अजून परीक्षा केंद्रात प्रवेश दिलेला नाही. या सगळ्या मुळे विद्यार्थी संभ्रम अवस्थेत आहेत,परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची झुंबड उडालेली आहे.

New Criminal Law In India Live : नवीन कायदे घाईत लागू करू नयेत, मुख्यमंत्र्यांचे आम्हाला आदेश - विमान बॅनर्जी

आजपासून लागू होत असलेल्या 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांबद्दल, पश्चिम बंगालचे सभापती विमान बॅनर्जी म्हणाले, "या कायद्यांबाबत खूप गोंधळ आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हे कायदे घाईत लागू करू नयेत असे आदेश दिले आहेत."

winter session Live Updates : अधिवेशन संपण्यापूर्वी पेपरफुटीचा कायदा आणणार- फडणवीस

पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यात पेपर फुटीचा कायदा आणणार, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभे दिली.

Nashik Live Updatest : नाशिकमध्ये पुन्हा दोन मतपत्रिका जास्त, ठाकरे गटाचा आक्षेप

नाशिक शिक्षक मतदारसंघात मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा 2 मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली आहे. यावर ठाकरे गटाने पुन्हा घेतला आक्षेप, याआधी 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या.

भरतीदरम्यान उमेदवारांकडून एक हजार रुपये घेऊ नयेत- राजेश टोपे

परीक्षा भरती दरम्यान उमेदवारांकडून एक हजार रुपये घेतले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो. अनेक ठिकाणी गडबड होते..टीसीएस आणि एमकेसीएलमार्फत भरती करावी, अशी मागणी आमदार राजेश टोपे यांनी केली होती.

त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना सकारात्मक सूचनांचं पालन केलं जाईल, असं म्हटलं आहे.

Mumbai-Nashik Traffic Live: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

वाशिंद आणि आसनगावजवळ उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांसह स्थानिकांनाही याचा फटका बसत असल्याचे दिसत आहे.

CBI Live: NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी खाजगी शाळेच्या मालकाला अटक

NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी CBI ने एका खाजगी शाळेच्या मालकाला अटक केली. ही शाळा परीक्षा केंद्रांपैकी एक होती जिथे 5 मे रोजी NEET-UG परीक्षा घेण्यात आली होती.

MLC Election Live: पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरूवात

मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक विधान परिषद मतदार संघात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

NEET Retest Live: नीट रीटेस्टचा निकाल जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, अंडरग्रेजुएट (NEET UG) 2024 रीटेस्टचा निकाल जाहीर केला आहे.

ही रीटेस्ट 1563 उमेदवारांसाठी घेण्यात आली होती. या पुनर्परीक्षेत सहभागी झालेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET वर जाऊन त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

Assembly Session Live: घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी

घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी विधानसभेमध्ये लक्षवेधी सादर करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळू शकतात.

Parliament Session Live: काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची दिली नोटीस

काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. आजपासून लागू झालेल्या नव्या तीन फौजदारी कायद्यावर चर्चा घेण्याची त्यांची मागणी आहे. शून्य प्रहरामध्ये या विषयावर चर्चा करण्याची तिवारी यांची मागणी आहे.

Vidarbh School Started Live: विदर्भाच्या शाळा आजपासून सुरु, विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत

विदर्भामध्ये आजपासून शाळा सुरु झाल्या आहेत. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याचा शाळांकडून प्रयत्न होतं आहे. विद्यार्थ्यांना गुलाब किंवा खाऊ दिला जात आहे.

Teacher and Graduate Constituency Live: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतमोजणीला आठ वाजता सुरुवात

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतमोजणीला आज आठ वाजता सुरुवात होईल. नाशिक, मुंबई, कोकण अशा चार मतदारसंघासाठी मतमोजणी होत आहे. महायुती आणि महाआघाडीची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली आहे.

Mumbai Rain Update Live: मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, कोकणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस पडेल असेल हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

आज विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा चार जागांचा निकाल लागणार आहे. तसेच, संसदेचे अधिवेशन सुरु आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊ शकतात. राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.