
बंगळूर : कृष्णा लवादाच्या निकालानुसार कर्नाटकाच्या वाट्याचे पाणी अडविण्यासाठी आलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवणे आवश्यक आहे. न्यायाधीकरणाचा निकाल आला, तेव्हा मौन बाळगणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आक्षेप व्यक्त करणे आश्चर्यकारक आहे, असे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले.