महाराष्ट्रात कोरोनाबाबत दिलासादायक बातमी; दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाची आरोग्य मंत्रालयाकडून माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 3 September 2020

देशात कोविड-१९ महामारीबाबतचे दुसरे सिरो सर्वेक्षण सुरू झाले असून आगामी २ आठवड्यात त्याचे निकाल येतील असे भारतीय आयर्विज्ञान संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) आज सांगण्यात आले.

नवी दिल्ली - महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येमध्ये गेल्या तीन आठवड्यात सुमारे ७ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मृत्युदरातही ११.५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे निरीक्षण आरोग्य मंत्रालयाने नोंदविले आहे. दरम्यान, देशात कोविड-१९ महामारीबाबतचे दुसरे सिरो सर्वेक्षण सुरू झाले असून आगामी २ आठवड्यात त्याचे निकाल येतील असे भारतीय आयर्विज्ञान संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) आज सांगण्यात आले.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रूग्ण व मृत्यूमुखी पडणारेही सध्या महाराष्ट्रासह फक्त ५ राज्यांतच आढळून येत आहेत. दुसरीकडे कोरोनाचे संक्रमण झालेल्यांची संख्या विक्रमी वेगाने वाढत वाढत रोज ८० हजारांच्या घरात पोहोचली तरी सक्रिय रूग्णसंख्येपेक्षा कोरोनाला हरविणाऱ्यांचे प्रमाण देशात साडेतीन पटींनी जास्त असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला. दिल्लीत रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे, त्याबाबत सरकारने आरोग्य नियमावलीचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे, अशी सूचना केली आहे.

सचिव राजेश भूषण और आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी आज पत्रकार परिषदेत कोरोनास्थितीची माहिती दिली. जगाच्या तुलनेत भारतातील सक्रिय रुग्णसंख्या व मृत्युदर अजूनही कमी आहे. देशात १० लाख लोकांमागे ४९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. २९ लाख ७० हजार भारतीयांनी कोरोना हरविले आणि ही संख्या सक्रिय रुग्णसंख्येपेक्षा साडेतीन पटींनी जास्त आहे.

देश विदेशातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र व तमिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून एकूण संख्येच्या ६२ टक्के सक्रिय रुग्ण आहेत, असे सांगून भूषण म्हणाले, की आतापावेतो सर्वांत जास्त म्हणजे ७० टक्के मृत्यू महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांत झालेले आहेत. मात्र दर आठवड्याला सक्रिय रूग्णसंख्येच्या वाढीची गती मंदावली आहे. मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या ६.८ टक्क्यांनी घटली आहे. इतर राज्यांचे हेच प्रमाण आंध्र प्रदेश (१३.७ टक्के,) कर्नाटक (१६.१टक्के), तमिळनाडु (२३.९ टक्के) व उत्तर प्रदेश (१७.१टक्के) असे आहे. तसेच महाराष्ट्रातील मृत्युदरातही ११.५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे निरीक्षण आरोग्य मंत्रालयाने नोंदविले.

मास्कसक्ती फक्त समूहापुरती
कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे आहे. मात्र याबाबत केंद्राचे दिशानिर्देस स्पष्ट आहेत, असे सांगून भूषण म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती घरात असते किंवा कोणी कारमधून एकटाच चाललेला असेल तर त्याच्यावर मास्कची सक्ती नाही. जेव्हा धावण्यासारखे व्यायाम, सायकलिंग काही लोक एकत्र येऊन करत सतील त्यावेळी मात्र मास्क वापरणे व सामाजिक अंतरभानाची अट पाळणे प्रत्येकावर बंधनकारक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra covid 19 situation second sero survey information by health ministry