महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आंदोलनास सर्वस्तरातून पाठींबा

मिलिंद देसाई
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई/ बेळगाव - महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आझाद मैदानावर गुरुवारी सीमाप्रश्नी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसह विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थितील लावली. 

या पुढे फक्त आंदोलन करून चालणार नाही तर ठोस भूमिका हातात घेऊन लढावे लागेल, महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी जागे करावे लागेल तरच सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक होईल असे मत भेट देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नी सरकार व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आदोलन सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, संध्याताई कुपेकर यांनी हजेरी लावली. तसेच आंदोलकांना मार्गदर्शन केले

एनयेजेयुएमच्या राज्य अध्यक्षा शीतल करंदेकर, इस्लामपूर येथील विजय जाधव, पत्रकार मंगेश चिवटे यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.  

Web Title: Maharashtra Ekikaran Samiti agitation in Mumbai