भगवेमय वातावरण अन्‌ मराठी बाणा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

बेळगाव - ‘नाही.. नाही.. मुळीच.. नाही कर्नाटकात राहणार नाही.’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेलमे’, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ आदी घोषणांनी व्हॅक्‍सिन डेपो मैदानाचा परिसर मराठी भाषिकांनी दणाणून सोडला.

बेळगाव - ‘नाही.. नाही.. मुळीच.. नाही कर्नाटकात राहणार नाही.’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेलमे’, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ आदी घोषणांनी व्हॅक्‍सिन डेपो मैदानाचा परिसर मराठी भाषिकांनी दणाणून सोडला. डोक्‍यावर भगवे फेटे, भगव्या टोप्या परिधान करून, हातात भगवी पताका घेऊन सीमाभागाच्या विविध भागातून मुले, महिला, वृध्द आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे महामेळाव्याचा आवार भगवामय बनला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते महामेळाव्याला उपस्थित राहून आपला मराठी बाणा दाखवून दिला.
सोमवारी (ता. १०) सकाळी दहा वाजल्यापासून व्हॅक्‍सिन डेपो मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते एकत्र जमू लागले. मैदानाकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिस तैनात होते. हातात भगवे ध्वज घेऊन आणि संयुक्त महाराष्ट्रच्या घोषणा देत युवकांचे गट सामील होत होते. प्रामुख्याने बेळगाव आणि खानापूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून लोक अधिक होते. महिलांचीही संख्या लक्षणिय होती.

महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे आगमन होताच उपस्थित जनसमुदायाने बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्रातील नेते येण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडे, सीमाप्रश्‍नावर आधारीत काव्य रचना, कर्नाटक सरकाचा अत्याचारावर अधारीत कविता सादर करून वेदना मांडल्या.

चौथी पिढीही सहभागी..
सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद कमी होत असल्याची चर्चा सुरू असताना आज झालेल्या मेळाव्यात विविध येळ्ळूरच्या घटनेसह अन्य विषयाचे फलक हातात घेऊन बालकांनी मेळव्यास्थळी प्रवेश केला. त्यामुळे ‘आता सीमाप्रश्‍नाच्या चळवळीत चौथी पिढीही सक्रिय होताना दिसतेय.. ’ अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.

Web Title: maharashtra ekikaran samiti conference