बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातल्या सीमावादात अतिशय महत्वाच्या असणाऱ्या सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्का बसला आहे.

या निवडणुकीत समिती फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. समितीने यावेळी तीन जागा लढवल्या होत्या मात्र आता ती फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. मागील निवडणुकीत समितीने दोन जागा जिंकल्या होत्या. 

सीमाभागात कॉंग्रेस 7 जागी आघाडीवरआहे तर भारतीय जनता पक्ष 10 जागावर आघाडीवर आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार खरेत सर्वसंमतीने ठरले होते पण त्यानंतर समितीत कुरबुर सुरू होती. सीमाभागत समितीच्या तीन जागा निवडून येणे गरजेचे होते. 

Web Title: Maharashtra Ekikaran Samiti lost the base in Karnataka Elections