Maharashtra Govt Didn’t Send Heavy Rainfall Aid Proposal
esakal
काही महिन्यांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन, मका, द्राक्ष, कांदा, ऊस यासारख्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. तसेच अनेक गावं पाण्याखाली गेली होती. त्यामुळे येथील दैनंदिन जीवनही विस्कळीत झाल होतं. त्यावेळी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र, आता या मदतीसाठी राज्य सरकराने कधी प्रस्तावच दिला नाही, अशी माहिती पुढे आली आहे.