

Maharashtra Rain Alert pune red alert
esakal
Bay Of Bengal Low Pressure Rain Alert : बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि कोकणात जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून, उर्वरित राज्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पुढील पाच दिवस मध्य भारतात मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.