अथणी : आलमट्टी धरणाची (Almatti Dam Height) उंची ५२४ मीटरपर्यंत वाढविल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला कोणताही धोका किंवा नुकसान होत नाही. त्याहीपेक्षा हिप्परगी धरण ५२६ मीटर उंच आहे. त्याच्यामुळेही सांगली, कोल्हापूरला धोका होत नाही. महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेत आहे. आलमट्टी धरणाच्या अलीकडे असलेल्या हिप्परगी धरणाची उंची किती आहे, याची महाराष्ट्राला कल्पना आहे की नाही? महाराष्ट्राने उगीचच गोंधळ करून घेऊ नये, असे कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी सांगितले.