निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची उद्या महत्वाची बैठक

mahavikas aaghadi
mahavikas aaghadisakal

महाविकास आघाडीची उद्या बैठक

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी उद्या शरद पवार यांच्या निवास्थानी बैठक होणार आहे

डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी केला खर्गेंचा सत्कार

काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा सत्कार केला.

छत्तीसगड-मध्य प्रदेशातही भाजपचा पराभव होईल - ममता बॅनर्जी

अहंकार, गैरव्यवहार, यंत्रणांचा गैरवापर याच्या विरोधी लोकांनी नो व्होट टू बीजेपी अभियान राभवले. मी कर्नाटकच्या जनतेला आणि मतदारांना सलाम करते आणि काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन करते. आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात निवडणुका आहेत, इथेही भाजपचा पराभव होईल: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

महाराष्ट्रातील लोकांना पण बदल हवा ; शरद पवारांची महत्वाची प्रतिक्रिया

मी पराभवाची जबाबदारी घेतो - बोम्मई 

"...मी या पराभवाची जबाबदारी घेतो. याची अनेक कारणे आहेत. आम्ही सर्व कारणे शोधू आणि संसदेच्या निवडणुकीसाठी पक्षाला पुन्हा एकदा मजबूत करू..," कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

हा जनतेच्या शक्तीचा विजय असून धनशक्तीचा पराभव - राहुल गांधी

कर्नाटक विजयानंतर राहुल गांधी यांन कर्नाटकातील जनतेचे आभार मानले. तसचे हा जनतेच्या शक्तीचा विजय असून धनशक्तीचा पराभव असल्याचे ते म्हणाले. हा प्रेमाचा विजय असल्याचे देखील त्यांनी सांगितेल.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा

कर्नाटकमधुन आलेले कल पाहता महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राहुल गांधी आणि पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर लवकरच महाविकास आघाडीची बैठक देखील घेणार आहेत. तर शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली आहे.

केरळ स्टोरी खोटी, कर्नाटक स्टोरी खरी - इम्तियाज जलील

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर एमआयएमचे खासदार यांनी ट्वीट करत भाजप आणि पंतप्रधान मोदींना डिवचलं आहे. त्यांनी द केरळ स्टोरी चित्रपटावरून त्यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्वीट केलं की, "केरळ स्टोरी खोटी आहे. कर्नाटकची गोष्ट खरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासाठी मल्टीप्लेक्समध्ये दोन तिकिटे आणि पॉपकॉर्न प्रायोजित करणार. आता जा आणि थंड व्हा."

mahavikas aaghadi
Karnataka Election Result : पराभव स्विकारत बोम्मई आले माध्यमांसमोर; म्हणाले काँग्रेसने…

UP Local Body Elections : मतपेट्यांवर ओतलं तेजाब अन् पाणी; ८० जणांवर गुन्हा

उत्तरप्रदेशमधील बिल्हौर नगरपालिका निवडणूकेदरम्यान तीन मतदान केंद्रात मतपेट्यांवर पाणी आणि तेजाब टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.

या प्रकारानंर ८० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याच तीन मतदान केंद्रात सर्वात जास्त मतदान झाले आहे. याठिकाणी ६९.१५ टक्के मतदान झाले आहे.

सातारा दौऱ्यावर निघालेल्या CM शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

सातारा दौऱ्यावर निघालेल्या CM शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. राजभवनाच्या हेलिपॅडवरून ते एका कार्यक्रामासाठी सातारा दौऱ्यावर जात होते, तेव्हा हा प्रकार घडला आहे.

येत्या २-३ तासांत ते स्पष्ट होईल - एचडी कुमारस्वामी

कर्नाटक निवडणूक निकाल २०२३ : येत्या २-३ तासांत ते स्पष्ट होईल. एक्झिट पोल दाखवतात की दोन्ही राष्ट्रीय पक्ष मोठ्या प्रमाणात स्कोअर करतील. एक्झिट पोलने JD(S) ला ३०-३२ जागा दिल्या आहेत. मी एक छोटा पक्ष आहे, माझ्यासाठी कोणतीही मागणी नाही... मला चांगल्या विकासाची आशा आहे: जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी

कर्नाटक विधानसभा निवडणूकीची मतमोजणी केली जात आहे. या निवडणूकीत काँग्रेस आणि भजाप या दोन पक्षात लढत पाहायला मिळत आहे. यादरम्यान देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, इतर राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन यासह सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com